फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

‘मोलकरीण बाई’ मालिकेचं शीर्षकगीत म्हणजे ममता आणि गावरान ठसका याचा उत्तम मिलाफ

Fillamwala by Fillamwala
15/05/2019
in Television, Title Songs, Upcoming
322 3
0
Home Television Title Songs
1k
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२५ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. प्रोमोप्रमाणेच या मालिकेचं शीर्षकगीतही काळजाला भिडणारं आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय.

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कुटुंबातली सदस्य नसली तरी ती कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग असते. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व मालिकेच्या शीर्षकगीतातून रेखाटण्यात आलंय.

‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगताना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की म्हणाले, ‘प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं हे शीर्षकगीत आहे. दिस रात पदरात, जरी कष्टाचं आंदण… दाराशी बांधलं तिनं, स्वप्नांचं तोरण… हे शब्दच खूप बोलके आहेत. ममता आणि गावरान ठसका याचा उत्तम मिलाफ या शीर्षकगीताचं वेगळेपण म्हणता येईल.

स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगणारी अशी "अनिता"…
नवी मालिका "मोलकरीण बाई – मोठी तिची सावली"
२५ मार्चपासून सायं ६:३० वा. Star प्रवाह वर #MolkarinBai #MothiTichiSaavli #StarPravah pic.twitter.com/7TcaPVi9gh

— Star Pravah (@StarPravah) March 12, 2019

रोहिणी निनावेंनी हे शीर्षकगीत लिहिलं आहे. मालिकेची कथा आणि पात्रांचं मनोगत शीर्षकगीतातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कष्ट करणाऱ्या स्त्रियांविषयीची ही मालिका आहे. दु:खातही सुख शोधण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती ‘मोलकरीण बाई’ या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हे शीर्षकगीत आणि मालिका नक्की आवडेल अशी भावना रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली.

ऊर्मिला धनगरच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालंय. सुंदर शब्द आणि सुरेख चाल असल्यामुळे हे गाणं गाताना खुपच मजा आली. माझ्यासाठी हे शीर्षकगीत खुपच स्पेशल असल्याचं ऊर्मिला म्हणाली.

रक्ताचं नातं नसतं काही, पण ती हाकेला धावणारी ताई असते ,
बाळाला जोजवणारी माई असते , हसतमुख वागत असते ,
आपल्यासाठी राबत असते , घरोघरी वावरत असते , ती कष्टाळू माऊली !
नवी मालिका "मोलकरीण बाई – मोठी तिची सावली"
२५ मार्चपासून सायं ६:३० वा. Star प्रवाह वर #MolkarinBai #StarPravah pic.twitter.com/T54fEkP0IN

— Star Pravah (@StarPravah) March 12, 2019

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांच्या आवडी-निवडीचा विचार करत वैविध्यपूर्ण मालिका सादर केल्या आहेत. ‘मोलकरीण बाई’ ही मालिकादेखील अश्याच एका अनोख्या जगाची सफर प्रेक्षकांना घडवेल.

Tags: मालिकामोलकरीण बाईशीर्षकगीत
Share412Tweet257Pin93Scan
Previous Post

रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेलं ‘मोरुची मावशी’ हे नाटक परत येतंय

Next Post

छत्रपती शासन सिनेमाची जवानांना अनोखी मानवंदना

Related Posts

भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय

भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय

11/02/2022
कॅम्पस डायरिज

अभिनेता मनोज जोशी यांची दमदार भूमिका असलेला ‘कॅम्पस डायरिज’

18/12/2021
‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’

15/12/2021
Pushkar Jog, Sonalee Kulkarni and Ashay Kulkarni to come together for Anand Pandit's 'Victoria'

Pushkar Jog, Sonalee Kulkarni and Ashay Kulkarni to come together for Anand Pandit’s ‘Victoria’

14/12/2021
Next Post
छत्रपती शासन सिनेमाची जवानांना अनोखी मानवंदना

छत्रपती शासन सिनेमाची जवानांना अनोखी मानवंदना

कोण होणार करोडपती मध्ये सहभागी होण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ द्या

कोण होणार करोडपती मध्ये सहभागी होण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ द्या

  • Trending
  • Comments
  • Latest
कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

21/05/2022
आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

20/05/2022
पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल

16/05/2022
बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

16/05/2022
कंगना रणौत

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर! म्हणाली, “ते सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे…”

16/05/2022

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In