बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी ती आपली नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचे नाव ‘पाताल लोक’ असं आहे.

या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पाताल लोक’ची निर्मिती स्वत: अनुष्काने केली आहे. खोट्या बातम्या, भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, धार्मिक भेद अशा विषयांवर आधारित ही सीरिज आहे. प्रतिष्ठीत समाजाची गडद बाजू दाखवण्याचा प्रयत्न या सीरिजमधून केला जाणार आहे.
ही सीरिज अमेझॉन प्राईमवर येत्या १५ मे पासून पाहता येईल. या थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी यांसारखे प्रसिद्ध कलाकार अभिनय करताना दिसतील. NH10 आणि उड़ता पंजाबचे लेखक सुदीप शर्मा यांनी या सीरिजची पटकथा लिहिली आहे.