सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक चित्रपट, वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळत आहे. २०२० मध्ये अल्ट बालाजीने त्यांच्या आगामी ‘अ मॅरिड वूमन’ या सीरिजची घोषणा केली होती. त्यानुसार, आता या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
She was everything society wanted her to be, a good daughter, a good wife, a good mother; she was fragments of lost pieces of herself.
But then, Love happened!
This is Astha's journey as her heart finally chances upon a connection that satisfies the craving of her soul. pic.twitter.com/hI3WCCuDcz— Ekta Kapoor (@ektarkapoor) February 9, 2021
प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या अ मॅरिड वूमन या कादंबरीवर आधारित ही सीरिज असून या सीरिजचं पहिलं पोस्टर आणि टीझर एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
या सीरिजची कथा आस्था या पात्राभोवती फिरताना दिसते. कर्तव्य आणि इतरांसाठी सतत धावपळ करणारी स्त्री स्वत:च अस्तित्व विसरत चालली आहे. यावर या सीरिजमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.
दरम्यान, या सीरिजमध्ये रिधी डोगरा, मोनिका डोगरा,इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर, सुहास आहुजा ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.