डेली सोप म्हटलं, की एका क्षणाला कथानक फुलवणं लेखकाच्या दृष्टीनं कठीण होऊन जातं. प्रेक्षकांनाही तोच-तोचपणा नको असतो. मग पर्याय निघतो तो लीपचा. म्हणजे मालिकेचं कथानक काही वर्षांनी पुढं ढकललं जातं. यामुळे कथानकाचा गुंता आपोआप सुटतोच; शिवाय नवीन चेहरे आणायचीही संधी मिळते. या हेतूनं येत्या महिन्यात बड्या मालिकांमध्ये लीपनंतरचं कथानक पाहायला मिळणार आहे.’
तुम्ही कितीही मीटिंगमध्ये असाल, कामात असाल तरी ही नवी कथा चुकवायची नाही.
नवी मालिका 'अग्गंबाई सुनबाई' १५ मार्चपासून सोम ते शनि रात्री.८:३० वा. झी मराठीवर.आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUGया लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/JdZfU8ucKX
— Zee Marathi (@zeemarathi) February 24, 2021
अग्गंबाई सासूबाई मालिकेत सध्या आनंदी आनंद सुरू आहे. सोहम सुधारलाय, चांगला मुलगा आणि नवरा बनण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. मालिकेत सर्व काही व्यवस्थीत सुरू असल्यानं हा मालिकेचा शेटव आहे की काय? अशा चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगल्या होत्या. परंतु मालिका आता काही वर्षे लीप घेणार आहे. म्हणजे मालिकेत काही वर्षांनंतरचं कथानक दिसणार आहे.मालकेतील काही पात्र या नवीन कथेतही असणार आहेत, काही पात्रांना मात्र नवीन चेहरे देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर मालिकेचं नाव देखील बदलण्यात आलं आहेय आता अग्गंबाई सासूबाई नव्हे तर ‘अग्गंबाई सुनाबाई’ असं नाव असणार आहे.
‘अग्गंबाई सुनबाई’ मालिकेच्या पुढच्या कथेत शुभ्राची म्हणजेच आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या सुनेची भूमिका तेजश्री प्रधान साकरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तेजश्रीच्या जागी आता उमा पेंढारकर ही अभिनेत्री दिसणार आहे. उमानं यापूर्वी ‘स्वामिनी’ मालिकेत पार्वतीबाईंची भूमिका साकरली होती.
सोहमच्या भूमिकेत आशुतोष पत्कीचं असणार की नवीन चेहरा पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे