अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या आगामी चित्रपट ‘झिम्मा’ चं पोस्टर आज सोशल मिडीयावर लाँच केला. या पोस्टरला चाहत्यांची व प्रेक्षकांची पसंती मिळत असून, २३ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर यांसारखे मोठे कलाकार झळकणार आहेत. चलचित्र कंपनी प्रस्तुत अमेय विनोद खोपकर इंटरटेनमेंट’ आणि क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित झिम्मा चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.
‘असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो… आता या नव्या वर्षात, नवे आपण, खेळूया… ‘झिम्मा’ २३ एप्रिल पासून!!!’,
असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो…
आता या नव्या वर्षात,
नवे आपण,
खेळूया… ‘झिम्मा’
२३ एप्रिल पासून!!!#Jhimma #23April #ChalchitraCompany #CrazyFewFilms #AvkEntertainment pic.twitter.com/9ZnNcKeUeT— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 5, 2021
‘बघतोस काय मुजरा कर’ चित्रपटातून हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. आता दुसरा चित्रपट झिम्माची घोषणा करत हेमंत ढोमेंनी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली. या पोस्टरमध्ये सगळे कलाकार आयुष्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. ‘नव्या वर्षात खेळूया नवे खेळ’ अशी टॅगलाईन देत हेमंत ढोमे यांनी आपल्या प्रेक्षकांना सरप्राईज दिले.
सरकारने चित्रपटगृहावरची बंदी हटवल्यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नोव्हेंबरमध्ये झिम्मा चित्रपटाची घोषणा केली होती. आज या चित्रपटाचा पोस्टर लाँच झाल्यानंतर चाहत्यांमध्ये नवा उत्साह दिसत आहे.