सारेगमपा लिटिल चॅम्स या कार्यक्रमाला एकेकाळी चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या कार्यक्रमातील कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैश्यंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत या स्पर्धकांना तर चांगलीच लोकप्रियता मिळाली. आज या गायकांनी मराठी इंडस्ट्रीत आपले चांगलेच नाव कमावले आहे. या कार्यक्रमात झळकलेली एक चिमुरडी सध्या प्रेक्षकांना कलर्स मराठीच्या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. तिच्यासाठी अवधूत गुप्तेने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

लिटिल चॅम्समधील या चिमुरडीचे नाव मालविका दिक्षित असून ती नुकतीच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून बाहेर पडली. अवधूतने तिचा सारेगमपा लिटिल चॅम्समधील फोटो शेअर करत तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, डियर मालविका, एवढिश्शी होतीस.. तो मंच सोडून गेलीस आणि परत काही वर्षांनी.. मोठ्ठ्ठ्ठ्या मंचावर पुन्हा एकदा मोठ्ठी होऊन आलीस! वाईट वाटून घेऊ नकोस गं… हा मंच सोडून गेलीस, तरी माझी खात्री आहे, आणखी मोठ्ठ्या मंचावर आपण पुन्हा भेटू! तेव्हा तू अजून मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठी झालेली असशील.. पण फक्त वयाने नव्हे.. अनुभवाने, अभ्यासाने, गाण्याने आणि गुणाने सुद्धा!! ओक्के?? गुडलक बेब्स…
View this post on Instagram
मालविकाने लिटिल चॅम्स या कार्यक्रमात एकाहून एक सरस गाणी गात रसिकांचे मन जिंकले होते. आता देखील तिने सूर नवा ध्यास नवा द्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले.
View this post on Instagram
ठळक मुद्देलिटिल चॅम्समधील या चिमुरडीचे नाव मालविका दिक्षित असून ती नुकतीच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून बाहेर पडली.