इंडियन आयडॉल हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असा शो मधील एक आहे. सोनी टेलिव्हिजन वरील इंडियन आयडॉल या सिंगिंग शो चा नुकताच १२ वा सीजन पार पडला.पवनदीप राजन हा इंडियन आयडॉल १२ व्या सीजन चा विजेत्या पदाचा दावेदार ठरला आहे.
२००४ पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाने देशातील अनेक होतकरू गायकांना एक सुवर्ण मंच उपलब्ध करून दिला आहे,तसेच या मंचावरील प्रत्येक गायकाने भारतातील प्रेक्षकांना त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध केले आहे.
तर संपूर्ण देशाला आता इंडियन आयडॉल सीजन १३ चे वेड लागले आहे तर इंडियन आयडॉल सीजन १३ साठी देशातील अनेक शहरांमध्ये ग्राउंड ऑडिशन ला ८ जुलै २०२२ पासून सुरू झाली असून आतापर्यंत जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, पाटणा, कोलकाता, इंदूर आणि लखनौ या शहरांमध्ये पार पडली आणि आता आपल्या लाडक्या मुंबईत सुद्धा येत्या २४ जुलै रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००७२ येथे सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरू होणार आहेत.
View this post on Instagram
तर तुम्ही सुद्धा तुमच्यातील कला- गुणांना वाव देण्यासाठी आणि तुमच्या स्वरांनी इंडियन आयडॉल च्या श्रोत्यांना मोहून टाकण्यासाठी इंडियन आयडॉल २०२२ सीजन १३ ग्राउंड ऑडिशन चा भाग व्हा.