शहनाझ गिल पहिल्यांदाच सलमान खानच्या आगामी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
सलमानचा ‘कभी ईद कभी दिवाळी’ या आगामी चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘बिग बॉस’ फेम शहनाझ गिल पहिल्यांदाच या चित्रपटातून बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु या चित्रपटाबद्दल सध्या वेगळीच माहिती समोर येत असल्याने चाहते मात्र नाराज आहेत. सलमान खान आणि शहनाझ गिल यांच्यात बिनसल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
याच गोष्टीचा पुरावा म्हणजे सलमान खानला सोशल मीडियावर अनफॉलो करत शहनाझने तीचा राग व्यक्त केल्याचे समजते आहे परंतु या सर्व घटनेवर सलमान, शहनाझ किंवा निर्मात्यांकडून शिक्कामोर्तब झालेला नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी शहनाझ गिल हिला चित्रपटातून काढून टाकल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स कडून मिळाली आहे.