बॉलीवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘शेरशाह’. या चित्रपटामध्ये कियारा आणि सिद्धार्थ दोघेही मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे बर्याचदा एकत्र दिसू लागल्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच त्यांच्या ब्रेकअपची ही चर्चा झाली, परंतु त्या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी अजून काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही.
View this post on Instagram
कियाराने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी गेल्यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रित केलेला व्हिडिओ तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओवर सिद्धार्थने केलेल्या कॉमेंट मुळे कियारा आणि सिद्धार्थचे चाहते पुन्हा त्यांच्याबद्दल तर्क लावण्यात मग्न झाले आहेत. या व्हिडिओ मध्ये कियारा इंडिया गेट समोर उभी असून तिच्यासमोर तिरंगा फडकताना दिसत आहे. परंतु कियाराने सिद्धार्थला या व्हिडिओ मधून वगळले आहे.
कियाराच्या या व्हिडीओवर सिद्धार्थने कॉमेंट केली की “मला क्रॉप केल्याबद्दल धन्यवाद.” त्यामुळे कियारासमोर झेंडा फडकवणारी व्यक्ती ही सिद्धार्थच आहे हे सिद्ध झाले आहे. सिद्धार्थच्या कॉमेंटवर कियाराने उत्तर दिले की, “तुझा हात तर दिसत आहे ना.” त्यामुळे सिद्धार्थचे चाहते नाराज झाले असले तरी त्यांच्यातील नात्याची खबर जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.