करण जोहर होस्ट करत असलेला ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांमुळे चर्चेत असतो. नुकताच या कार्यक्रमाच्या ७व्या सिजनचा ७व्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला. या कार्यक्रमामध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसून आले. या कार्यक्रमामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहर विकी कौशलची कतरीना कैफवरून खिल्ली उडवतांना दिसले. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राला देखील त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
करण जोहरच्या या चॅट शोमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बरेच खुलासे केले. विकीचं आयुष्य करण जोहरच्या शोमुळे नेमकं कसं बदललं याबद्दल विकीने खुलासा केला. कतरिना कैफने करण जोहरच्या चॅट शोमध्ये तिला विकी कौशल सोबत काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. विकी कौशलला हे कळल्यानंतर खूप आनंद झाला होता. २०२१ मध्ये विकी आणि कतरिनाने एकमेकांशी लग्नगाठ सुद्धा बांधली. यावरूनच विकी कौशलला सिद्धार्थ मल्होत्रा चिडवताना दिसला.
सिद्धार्थ मल्होत्राला करणने सिद्धार्थ आणि कियाराच्या नात्याबद्दल प्रश्न देखील विचारला. कियारासोबत लग्नाच्या प्लॅन बद्दल विचारताना करणने या शोमध्ये येणाऱ्या लोकांच्या घोषणा कशा यशस्वी झाल्या हे देखील सांगितले. “कियारा आडवाणी सोबत लग्न करण्याचा काही प्लॅन आहे का? असा प्रश्न देखील करणने सिद्धार्थला विचारला. या प्रश्नावर सिद्धार्थ “मी आनंदी आणि उज्ज्वल भविष्याची घोषणा करतो” असे म्हणताना दिसतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा या शो मध्ये कियारा सोबत लग्नाची घोषणा करणार का याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
नुकताच करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात जान्हवी कपूर-सारा अली खान, आमिर खान-करीना कपूर, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आलिया भट्ट-रणवीर सिंह अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली.