बॉलीवूड सिनेसृष्टीतील नामांकित निर्माता करण जोहर याच्या “कॉफी विथ करण ७” या लोकप्रिय शोच्या येत्या भागामध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा पाहायला मिळणार आहे.
करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी हे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे करताना दिसतात. बहुतेकदा त्यांचे कौटुंबिक आणि त्यांच्या आवडत्या व्यक्तींबद्दलच्या गप्पांसाठी हा शो लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी प्रदर्शित केला जातो.
विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे. तर सिद्धार्थ मल्होत्राही या शोमध्ये त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल नवे खुलासे करताना दिसणार आहे.
विकी कौशलने यावेळी कतरिना कैफ आणि त्याच्या लव्ह लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. कतरिना आणि आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना विकी म्हणाला की, “आम्ही पहिल्यांदा जोया अख्तरच्या घरी भेटलो होतो. तिथून आमच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली.” लग्नासंबंधीच्या आठवणींबद्दल सांगताना विकी लग्नसोहळ्यात असतानाही त्यांनी सोशल मीडियावरील मीम्स आणि मजेदार ट्वीट्सवर कसं लक्ष ठेवलं होतं आणि या सगळ्याचा आनंद कसा घेत होते हे सांगितले आहे.
विकी कौशल याने सांगितले की, “सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर तसेच हेलिकॉप्टरमधून रॉयल एंट्री यांसारख्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या. तेव्हा मी पंडितजींना सांगितलं होतं की, हा सर्व गोंधळ सुरू आहे, तर लवकरात लवकर आमचं लग्न लावून द्या. एक तासापेक्षा जास्त वेळ घेऊ नका आणि आणखी छापून येण्याआधी आम्हाला लग्न उरकून घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही यासाठी घाई केली होती.”
सेलिब्रेटींच्या अशाच खासगी आणि गमतीदार गोष्टींचा खुलासा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये होत असतात.