आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी एक खास भावना असते. आईपणाचे सुख हे इतर सुखांपुढे नक्कीच मोठे असते. पहिल्यांदाच आई होण्याचा आनंद घेणारी अभिनेत्री सोनम कपूर हिचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. सोनम प्रेगन्सी दरम्यान तिच्या फीलिंगस् बद्दल नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसली आहे. आणि आता सोनम आणि आनंद यांनी आई-बाबा झाले असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. सोनम कपूर ने बाळाला जन्म दिल्याचे समजताच तिच्यावर आणि बाळावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. नातवाच्या आगमनाने अनिल कपूर यांच्या देखील आनंदाला सीमा राहिली नाही, त्यांनी सुद्धा पोस्ट शेअर करत लिहले की, “आम्ही बाळाचे स्वागत करीत आहोत, बाळ सुदृढ आहे आणि आमच्या सर्वांच्या मनात बाळासाठी भरपूर प्रेम आहे. तसेच नवीन आई-बाबा, सोनम आणि आनंद यांना शुभेच्छा.”
नीतू कपूर यांनी सुद्धा इंस्टाग्राम स्टोरीतून सोनम, आनंद तसेच अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांना शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
सोनम कपूरने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आई झाल्याचे सांगितले. त्यात तिने लिहले की, “२० ऑगस्ट २०२२ ला आम्ही आमच्या लाडक्या मुलासमोर झुकून त्याचे स्वागत केले आहे. मी समस्त डॉक्टर, नर्स, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानते. ही फक्त सुरवात आहे, पण मला माहीत आहे की यापुढे मात्र आमचं आयुष्य पूर्ण बदलणार आहे.”
फॅशन मॅगझिनशी बोलताना सोनम म्हणाली की, “आता आमच्या प्रायोरीटीज बदलतील. अर्थातच आमचं बाळ हीच आमची सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे. कारण मुल हे त्याच्या इच्छेने या जगात येत नाही तर, आपण आपल्या इच्छेसाठी त्यांना या जगात आणतो. म्हणजेच आपण खूप स्वार्थी असतो आणि स्वार्थी वृत्तीने निर्णय घेतो.”