छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. तारक मेहता ही मालिका कायमच वेगवेळ्या गंमती-जंमतीमुळे, निराळ्या पद्धतीने देत आलेल्या सामाजिक संदेशामुळे आणि मनोरंजक कलाकारांमुळे चर्चेत असते. सध्या मात्र या मालिकेतील गाजलेल्या भूमिका पार पाडणाऱ्या कलाकारांची वाढत्या एक्सिट मुळे ही मालिका जोरदार चर्चेत आली आहे.
या मालिकेतील दया भाभी ही सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा दिशा वकानी यांनी पार पाडली होती. दिशा वकानी यांनी ही भूमिका इतकी चोख पार पाडली होती की त्यांच्या एक्सिट नंतर निर्माते असित कुमार मोदी हे दयाभाभी या व्यक्तिरेखेसाठी रीप्लेसमेंट शोधताना मात्र हैराण झाले आहेत.
त्यात आता आणखी एक नवीन बातमी समोर येत आहे की, मालिकेतील जेठालाल हे विनोदी पात्र साकारणारे दिलीप जोशी तारक मेहता ही मालिका सोडणार अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या जेठालाल अमेरिकेला चालले आहेत त्यामुळे त्यांची देखील मालिकेतून एक्सिट होणार का या कल्पनेने चाहते मात्र निराश झाले आहेत. तसेच अशाही चर्चा सुरु आहेत की जेठालाल अमेरिकेत जात आहेत पण मालिकेचा एक भाग म्हणून.
जेठालाल अमेरिकेला गेलेले दाखवणार म्हणजे ही व्यक्तिरेखा देखील इथेच थांबणार की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे हा मालिकेतील नवीन ट्विस्ट असेल की एक्सिट हे मालिकेचे नवीन एपिसोडच सांगतील.
तसेच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तिरेखा करणारे कलाकार आता मालिकेतून निघून गेले तर या मालिकेची मजाच निघून जाणार का याच विचारात सध्या प्रेक्षकवर्ग अडकला आहे.