बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमचं काही ना काही कारणाने चर्चेत असते. मागील काही महिन्यांपासून आलियाचा स्वतःच्या लग्नातील विथाऊट मेकअप लूकमुळे तर लग्नानंतर काहीच दिवसांतच दिलेल्या प्रेग्नेंसीच्या गोड बातमीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
आलिया भट्ट ब्रह्मास्त्र या आगामी चित्रपटामध्ये रणबीर कपूर सोबत झळकताना दिसणार आहे. आलिया आणि रणबीर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
आलिया आणि रणबीर हे त्यांच्या बाळाची काळजी घेत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया प्रेग्नेंट असूनही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी रणबीर सोबत दिसत आहे. नुकतच रणबीर आणि आलिया या कमाल जोडीने प्रमोशनसाठी एकत्र हजेरी लावली होती.
View this post on Instagram
यावेळी आलिया भट्टने तिच्या या आगामी चित्रपटातील प्रचंड लोकप्रिय झालेले ‘केसरिया’ हे गाणे सर्वांसमोर गायले. आलियाचा गोड आवाज ऐकून चाहते मात्र भारावून गेले. आलिया एक उत्तम गायिका सुद्धा आहे. चाहतेच नाही तर रणबीरही पुन्हा तिच्या प्रेमात पडला. आलिया गात असताना रणबीर पूर्णवेळ तिच्याकडे एकटक पाहत होता, तसेच गाणे संपल्यावर रणबीरने टाळ्या वाजवत आलियाचे कौतुक केले. त्यामुळे आलियाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून आलिया आणि रणबीरला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.