बॉलिवूड सिनेसृष्टीतील देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा. प्रियांकाने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड मध्येही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. प्रियांका नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील फोटोज् आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे ती कायम चर्चेत असते. तर ही देसी गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारणही तसेच खास आहे.
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत. यामुळे सध्या प्रियांका प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यातील हा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आज तिने पार केला.
View this post on Instagram
तिच्या या प्रवासाविषयी प्रियांकाने पिंकव्हिलाशी संवाद साधत असताना सांगितले आहे की, ‘मी गेल्या १० वर्षांपासून हॉलिवूडमध्ये काम करत आहे, पण आता मला अशा भूमिका मिळत आहेत, ज्या मला करायच्या होत्या. दक्षिण आशियाई कलाकारांना इथे फार संधी नाही, हॉलीवूडमध्ये खूप संघर्ष करावा लागतो. इथे सहजासहजी मुख्य भूमिका मिळत नाहीत. एखादा बिग बजेट चित्रपट करायचा असेल तर खूप संघर्ष करावा लागतो’, असं प्रियांकानं म्हटले आहे.
तसेच पुढे प्रियांका म्हणाली की, ‘मी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. माझं ध्येय निश्चित आहे. भारतातही मी सर्वोत्कृष्ट टॅलेंटसोबत काम केले आहे आणि मला हॉलिवूडमध्येही ते फॉलो करायचं आहे. माझी भारतातील कारकीर्द यशस्वी झाली आहे. मी सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसोबत काम केले आहे, ज्यामुळे मला स्वतःचा अभिमान वाटतो. एक कलाकार म्हणून मला हॉलिवूडमध्येही अशीच कामगिरी करायची आहे’.