२०१६ पासून सुरु असलेला ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच नवा कोरा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचा चौथा सिझन सप्टेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. निर्माता कपिल शर्माने शोच्या नव्या टीमसोबत शूटिंगलाही सुरुवात केली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ च्या नव्या सिझनचा पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार दिसणार आहे. नुकतच त्यांच्या या एपिसोडचे शूटिंग पूर्ण झाले.
अक्षय कुमारचे या वर्षात एकुण चार चित्रपट प्रदर्शित झाले, यांपैकी ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘रक्षाबंधन’ हे
३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. त्यानंतर अक्षय कुमारचा ‘कटपुतली’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी आधीपेक्षा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आला. असे असले तरी हा चित्रपट अगोदर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.अक्षयने अचानक त्याचा चौथा चित्रपट ‘कटपुतली’ ओटीटीवर प्रदर्शित केला, ज्यामुळे सर्वच चकीत झाले.
‘द कपिल शर्मा शो’ च्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा हा अक्षय कुमार आणि रकुलप्रीत सिंगचे स्टेजवर स्वागत करताना दिसत आहे. तेव्हा तो अक्षयला म्हणतो की, “पाजी, तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष लहान कसे होता?”
View this post on Instagram
कपिलच्या या प्रश्नावर अक्षय चिडतो आणि म्हणतो की, “हा माणूस माझ्या चित्रपटांवर आणि पैशांवर खूप लक्ष देतो. याने एवढी नजर लावली की, आता माझा कोणताही चित्रपट चालत नाही.” अक्षयचं हे बोलणं ऐकताच कपिल शर्मा आणि तेथील प्रेक्षकवर्ग हसायला लागतात. अर्थात अक्षय कुमारने हे सारे कपिल शर्माला हे गमतीने म्हटले आहे.