पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. पहील्याच मालिकेत मिळालेल्या यशामुळे तिने पुढे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रार्थनाला मिस्टर अँड मिसेस सदाचारी, मितवा या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर भरपूर कालावधीनंतर ती पुन्हा मालिका विश्वाकडे वळली. प्रार्थना झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेली “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून नेहा कामत या भूमिकेमधून घराघरात पोहचली आहे.
पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पार पडले आहे. यानिमित्त समीर म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे आणि यश म्हणजेच श्रेयस तळपदे यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना ही नेहा कामत या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना फार भाऊक झाली आहे. अन् तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन एक खास रील पोस्ट केली आहे.
प्रार्थनाने नेहा कामतच्या रूपातील एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहाला सांगतेय की, ‘अभि ना जाओ छोडकर, के दिल अभि भरा नहीं’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असं देखील तिने म्हटलं आहे. तसेच तिने नेहा या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.
View this post on Instagram
तिच्या या पोस्टवर चाहते देखील भाऊक झाले आहेत. या पोस्टवर सुध्दा चाहते भरपूर लाईक्स आणि कॉमेंट करीत आहेत. तर काही चाहते ‘आम्ही नेहाला मिस करु’, ‘आता परी आणि आईच्या जोडीची फार आठवण येईल’, यांसारख्या भावना व्यक्त करत आहेत.