मराठी मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय असणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर देखील तेवढीच ऍक्टिव्ह आहे. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत, ती तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे नेहमी संवाद साधत असते. ऋतुजाने तिच्या सोशल मीडियावरून एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. या माहितीमुळे तिच्या चाहत्यांनी खुश होऊन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋतुजाने तिच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार केला, तिने स्वतःचं घर घेतलं आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. फोटो शेअर करत तिने तिच्या आई बाबांचे आभार मानले आहेत. तिने असं लिहिलं आहे की, ‘लोक जेव्हा म्हणतात लग्न कधी करतेस तेव्हा माझी आई म्हणते तुला करावसं वाटेल तेव्हा लग्न कर, पण त्या आधी स्वतःचं घर घे… आई तू स्वप्न दाखवलंस त्यामुळे ते मी पूर्ण करू शकले. बाबा तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे’.
View this post on Instagram
पुढे ती असं ही म्हणाली,”तुमचं स्वप्न मी आज पूर्ण करू शकले याचा मला खुप आनंद होतोय, तो मी शब्दात मांडू शकत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आजून काम करण्याची उमेद देत आहे”.
ऋतुजाच्या या पोस्ट वर तिच्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव तर आहेच, तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील तिचे कौतुक केले आहे. २००८ मध्ये ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्येही काम केलं होतं. ऋतुजाला ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. ‘अनन्या’ या नाटकातील तिच्या भूमिकेचं देखील कौतुक झालं. तिला नवीन भूमिकेत बघण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.