कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’ हा सर्वाधिक लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे तीन पर्व पार पडले आहेत. आताच या शोच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाली आहे. त्यामुळे यावेळी कोणते नवीन टास्क असणार? यावेळी स्पर्धक म्हणून कोणते कलाकार सहभागी होणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी या शोचा होस्ट कोण असेल यावर जोरदार चर्चा रंगली होती पण काहीच दिवसांत पहिला प्रीमियर प्रदर्शित झाला अन् त्यात “खेळाडू नवे घर नवे आणि होस्ट…. वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तोच” असं म्हणत महेश मांजरेकर हेचं या पर्वाचे होस्ट असतील यावर शिक्कामोर्तब झाला.
View this post on Instagram
नुकतच ‘बिग बॉस मराठीचा ४’ चा दुसरा प्रीमियर प्रदर्शित झाला आणि आता संभाव्य स्पर्धकांच्या नावांची यादी व्हायरल झाली आहे. बिग बॉस खबरीने शेअर केलेल्या यादीनुसार, मराठीतील अनेक लोकप्रिय चेहरे यंदाच्या ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. यात हार्दिक जोशी, किरण माने, प्राजक्ता गायकवाड, शुभांगी गोखले, नेहा खान, अलका कुबल, सोनल पवार, रूचिरा जाधव, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदे, दीप्ती लेले, अनिकेत विश्वासराव, निखील चव्हाण, यशोमन आपटे, माधव अभ्यंकर आणि कार्तिकी गायकवाड यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. आता यात किती तथ्य हे लवकरचं समजेल.
अभिनेत्री रुपाली भोसले हिने इंस्टाग्राम प्रोफाइलवर आयोजित केलेल्या “मला काहीही विचारा” या सेगमेंटला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले की, हो मला बिग बॉस मराठी ४ मध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावायला आवडेल.
बिग बॉस मराठीचा ग्रॅण्ड प्रीमियर २ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.३० वाजता, सोम – शुक्र रात्री १० वाजता, शनि- रवि रात्री ९.३० वाजता पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या शोबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.