काही दिवसांपूर्वीच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला, चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली. सोशल मीडिया वर देखील चित्रपटाचं कौतुक होताना दिसतंय, अवघ्या ३ दिवसात ‘ब्रह्मास्त्र’ ने जगभरात २२५ कोटीची कमाई केली आहे.
काही दिवसांपूर्वीच आलियाने ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली, तरीपण काही दिवसांपासून ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. दरम्यानच्या काळात आलियाला कंबरदुखीचा त्रास होत असूनही ती वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रमोशन करताना दिसली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती नुकतीच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफीसबाहेर दिसली. आलिया गाडीतून जात होती, चेहऱ्यावरून दमलेली दिसत होती.
आलियाला बघून तिथे असलेले फोटोग्राफर्स तीजे फोटो काढण्यासाठी पुढे आले, त्यावेळी त्यांनी आलियाला गाडीतून बाहेर येऊन फोटो साठी पोज देण्यास सांगितले. पण त्यासाठी आलियाने नकार दिला. परंतु त्यासाठी आलियाने सगळ्यांची माफी देखील मागितली आणि ती म्हणाली, “मला माफ करा, मी चालू शकत नाही. त्यामुळे मी गाडीतून बाहेर येऊन पोज देऊ शकत नाही.”
आलिया प्रेग्नेंट असल्यामुळे तिला अनेक वेदना होत आहेत, म्हणून ती गाडीतून खाली उतरली नाही. पण तिने सगळ्यांची माफी देखील मागितली.
‘ब्रह्मास्त्र’ हा बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमा ९ सप्टेंबर ला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दाक्षिण्यात्य अभिनेता नागार्जुन अशी मोठी स्टार कास्ट आहे. अभिनेत्री मौनी रॉय देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला, त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फारशी कमाई करेल आस वाटलं नव्हतं. परंतु, अवघ्या ३ दिवसात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.