मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या खूप चर्चेत आहे. गश्मीरने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने वेड लावणारा गश्मीर हा एक उत्तम नर्तक आहे. सध्या तो ‘झलक दिखला जा’ च्या १०व्या सीझन मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. प्रेक्षक नेहमीच त्याच कौतुक करत असतात, पण आता माधुरी दीक्षित कडून देखील त्याच कौतुक झालं आहे.
सध्या सोशल मीडियावर गश्मीरचा झलक दिखला जा या कार्यक्रमातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ मध्ये गश्मीर सुलतान या गाण्यावर नृत्य करताना दिसतोय, या नृत्यात त्याने त्याच्या आयुष्यातील संघर्ष दाखवला आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीरसाठी अभिनय क्षेत्रात येणे सोप्पे नव्हते, यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. गश्मीरने लहान वयात खूप आर्थिक अडचणी अनुभवल्या आहेत, त्यामुळे गश्मीर आवड म्हणून नाही तर गरज म्हणून अभिनय क्षेत्रात आला.
अभिनयासोबत एक जोड व्यवसाय म्हणून गश्मीरच्या वडिलांनी बांधकाम व्यवसायात भागीदारी केली, परंतु तिथे त्यांची फसवणूक झाली. त्यांचं पुण्यातील राहत घर देखील जप्त करण्यात आलं, त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर देखील वाढला. गश्मीरच्या आईला देखील कमी पगाराची नोकरी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे आवड म्हणून करत असलेल्या नृत्याला गश्मीरने व्यवसाय बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने अकरावीत असताना अभ्यास करत नृत्याचे धडे देण्यास सुरवात केली. नृत्याचे धडे देत असताना गश्मीरने नाटकात देखील काम करायला सुरवात केली. गश्मीर वयाच्या १५ व्या वर्षांपासून डान्स अकादमी चालवत आहे. गरज म्हणून सुरु केलेल्या अकादमीने गश्मीरला सुखाचे दिवस दाखवले.
View this post on Instagram
हा संपूर्ण संघर्ष त्याने आपल्या नृत्यातून दाखवला, तो पाहताना त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. नंतर त्याची आई स्टेजवर आली व म्हणाली, “हा नसता तर आम्ही नसतो.” त्यानंतर माधुरीने देखील त्याच कौतुक केलं. ती म्हणाली, “गश्मीर, तू तुज्या आयुष्यातील सुलतान आहेस.”
गश्मीरचा हा संघर्ष पाहुण फक्त त्याच्या आईच्याच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. प्रेक्षकांना देखील त्याचा अभिमान वाटत आहे. सोशल मीडिया वर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय नेटकरी गश्मीरचे खूप कौतुक करत आहेत.