बॉलिवूडमधील सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नुकताच 9 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला ब्रम्हास्र सिनेमा. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. रणबीर कपूरसह आलिया देखील तिच्या गरोदरपणात सुद्धा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी उपस्थित असते.
ब्रम्हास्र प्रदर्शित झाल्यानंतर काहींना प्रचंड आवडला तर दुसरीकडे बॉयकॉट ट्रेंड सुरू झाला. प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी ‘ब्रम्हास्त्र’ ने जगभरात ३०० कोटींची कमाई केली असल्याचं म्हंटलं जातं. या चित्रपटात रणबीर-आलिया यांची केमिस्ट्री काही लोकांना प्रचंड आवडली आहे, तर काहींनी चित्रपटाला नावं ठेवली. पण सध्या सोशल मीडियावर आलियाला बरचं ट्रोल केलं जातंय .
View this post on Instagram
आलियाने गरोदर असतानाच तिचा हॉलिवूडच्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. त्यानंतर करण जोहरच्या एका चित्रपटाचं काम पूर्ण केलं, शिवाय ब्रम्हास्रच्या प्रमोशनमध्ये ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होती.
गरोदारपणातही चित्रपटाच्या प्रमोशनला जाणं किंवा हाय हिल्स चपला घालणं यांसारख्या कारणांवरून आलियाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
यावर नुकतंच रणबीरने एक वक्तव्य केलं आहे. जी लोकं आलियाच्या गरोदर असताना काम करण्यावर कॉमेंट करत आहेत त्या लोकांच्या वृत्तीला रणबीरने इर्षा किंवा मत्सर असं म्हंटल आहे. जी लोकं आलियाला ट्रोल करत आहेत त्यांना तिच्याबद्दल मत्सर आहे. असं रणबीरने स्पष्ट केलं आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला की, “गरोदर असतानाही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया पूर्णपणे सहभागी होती. तिच्याकडून तिने कसलीच कमतरता भासू दिली नाही. तिच्या या वागण्यामुळे कुणालाही प्रेरणा मिळेल. याबद्दल जर कुणी तिच्यावर टीका करत असेल तर ती लोकं नक्कीच आलियावर खार खात आहेत. आपण या सगळ्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करायला पाहिजे.”
तसेच रणबीर पुढे म्हणाला की, “आलिया ही भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाची अभिनेत्री आहे. ती केवळ माझी पत्नी आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर तिचं चित्रपट क्षेत्रातील योगदान, तिचा स्क्रीनवरील वावर, तिचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. मी आजवर हे गुण कोणत्याही कलाकारात पाहिलेले नाही. याचा आपण सगळ्यांनीच आदर करायला हवा.”