बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री समांथा रुथ प्रभू. समांथा ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते.
‘द फॅमिली मॅन 2’ मधील भूमिका आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील गाण्यानंतर ती अजूनच जास्त लोकप्रिय झाली. समांथा ‘यशोदा’, ‘शाकुंतलम’ आणि ‘कुशी’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती दिनेश विजानच्या बॉलिवूड आणि ‘द अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ या इंग्रजी चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती सज्ज झाली आहे.
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मागील वर्षी समांथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाल्याची घोषणा केल्यानंतर समांथा प्रचंड चर्चेत आली होती. तसेच त्यांचा चाहता वर्ग देखील नाराज झाला, आणि त्या दोघांनी एकत्र यावे अशी आशा करत होता. परंतू काही दिवसांनंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचे स्पष्ट केले.
घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य ‘मेजर’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा आहे. आणि असेही म्हंटले जात आहे की चैतन्यने शोभिताला त्याचं घरही दाखवलं आहे आणि दोघांनीही तिथे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला आहे.
आता दुसरीकडे समांथाने देखील तिच्या पुढील आयुष्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. समांथा तिचे गुरु सद्गुरुंच्या आज्ञेनुसार पुन्हा लग्न करण्यास तयार झाली आहे. एका वृत्तानुसार, समांथाला तिचे गुरू सद्गुरु जगदीश वासुदेव यांनी पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे ती त्यांच्या गुरूंच्या प्रत्येक सल्ल्याचे पालन करते. आता तिचे गुरु तिला तिचा भुतकाळ विसरण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. त्यामुळे आता समांथाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र अजूनही या वृत्ताला समांथाकडून शिक्कमोर्तब झालेला नाही. असा निर्णय घेतला तर ती कोणासोबत लग्नबंधनात अडकणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.