‘बिग बॉस’ हा अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शो आहे, हा शो प्रत्येक घराघरात पहिला जातो. लवकरच ‘बिग बॉस हिंदी’ चा १६ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेली अनेक वर्ष या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे, या वर्षी देखील तोच सूत्रसंचालन करणार आहे.
नुकतेच बिग बॉसची प्रेस कॉन्फरन्स पार पडली त्यावेळी या सीझनचा पहिला स्पर्धक कोण आहे हे देखील सलमान ने सांगितले . हा स्पर्धक दुसरा कोणी नसून तो ताजिकिस्तानातील गायक अब्दू रोजीक हा आहे.
View this post on Instagram
यंदा बिग बॉस हिंदीच्या घरात लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे दिसणार आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या टीमने शिवला संपर्क केल्याचे समजले आहे. त्यामुळे शिव बिग बॉसच्या घरात जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिव ने बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन चांगलाच गाजवला होता, या सीझनचा तो विजेता देखील ठरला. शिव ला ‘एमटीव्ही रोडीज’ या रिऍलिटी शोमधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझन मध्ये दिसला होता. या सीझन मध्ये शिव आणि वीणाच्या जोडीला प्रेक्षकांनी खास पसंती दिली होती, मात्र घरातून बाहेर येताच काही दिवसानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता प्रेक्षक त्याला हिंदी बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो वादग्रस्त असला तरी हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात.