जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये ८वी भाषा म्हणून आपल्या मराठीचा लौकिक आहे. नोकरी आणि शिक्षणानिमित्त आज मराठी माणसे जगभरात पसरली आहेत आणि त्यांच्यासोबत ‘अमृताते ही पैजा जिंके’ अशी आपली मराठी भाषा आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांमध्ये मराठी माणसांनी महाराष्ट्र मंडळ स्थापन करून मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या मराठी भाषेचा गोडवा फक्त बॉलिवूडचं नव्हे तर परदेशातील नागरिकांनाही लागल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
नुकताच ऑस्ट्रेलिया देशातील महाराष्ट्र मंडळात गायक राहुल वैद्य सोबत केनियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. यात त्याने मराठीत संवाद साधला. किली पॉल सोबत गायक राहुल वैद्यची भेट झाली. यावेळी राहुलने किलीला मराठीमध्ये व्यक्त होण्याची विनंती केली. यात किली ‘माझं नाव किली आहे, मी केनियावरून आलो आहे’ असे मराठीमध्ये म्हणताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो ‘जय महाराष्ट्र’ म्हणायला सुद्धा विसरला नाही. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले आहे.
किली पॉल हा प्रसिद्ध इंस्टाग्रामर आहे. तो व त्याची बहीण नीमा पॉल दोघेही प्रसिद्ध आहेत. भारतातही त्यांचे खूप फॉलोवर्स आहेत. ते बऱ्याचदा बॉलिवूडच्या गाण्यांवर रील्स बनवताना दिसतात.