महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत होती. सोनाली आणि कुणाल यांची वेडिंग स्टोरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली. सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नवरात्री स्पेशल सीरिज शेअर केली आहे. सोनालीने अष्टमीच्या दिवशी तिच्या एका खास आणि जवळच्या मैत्रिणीसाठी पोस्ट शेअर केली.
यापूर्वी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सोनालीचे चित्रपटसृष्टीत जास्त कोणासोबत पटत नसले तरी ज्यांच्या सोबत पटतं त्यांच्यासोबत ती शेवट पर्यंत असते. तर अशाच काही लोकांमधील एक व्यक्ती म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर. या दोघींच्या मैत्रीबद्दल सर्वांनीच ऐकले असेल. सोनालीच्या बहुतेक सिनेमात तिच्या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन फुलवाच करते. सोनालीच्या नवरात्री स्पेशल सीरिजच्या निमित्ताने सोनालीने फुलवाचे आभार मानले आहे.
View this post on Instagram
सोनालीने लग्नातील तिचा आणि फुलवाचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “माझी ताई फुलवा बुगी वुगी च्या दिवसांपासून तिची चाहती असण्यापासून ते स सासूचा साठी माझ्या पहिल्या अंगाई गाण्याच्या शूटसाठी तिला भेटण्यापर्यंत, ता. क. हेच ते तिने कोरयोग्राफ केलेलं माझं पहिलं गाणं
आणि मग नटरंग झाला आणि आमचे आयुष्य कायमचे बदलले, एकत्र!
तू खरोखर जादुई कलाकार आहेस,
तुझ्याकडून मी खूप काही शिकते !
तुमच्यातला लहान मुलांसारखा प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह मला माझ्यातही हवा आहे
माझ्यासारख्या कलाकारांना असेच प्रेरणा देत रहा आणि
स्वतःमधली ती आग कायम जिवंत ठेवा.”