झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा शो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अन् अल्पावधीतच या शोला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा या शोचे सूत्रसंचालन करत आहे.
बस बाई बस हा शो कलाक्षेत्र आणि इतर क्षेत्रांत चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा शो आहे. या शोच्या आगामी भागात मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री प्रिया बापट उपस्थित राहणार आहे. प्रिया कायमच तिच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही ना काही कारणाने ती नेहमीच चर्चेत असते.
प्रियाने केलेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेब सीरिज प्रेक्षकांना भरपूर आवडली. या वेब सीरिजमधील प्रियाचा अनोखा अंदाज पाहून प्रेक्षकांनी तिचे आणि तिच्या कामाचे खूप कौतुक केले. प्रियाने यात केलेली महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चांगलीच लोकप्रिय झाली. या वेब सीरिजमध्ये प्रिया बरोबर अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर या कलाकरांनी देखील काम केले.
बस बाई बस या शोमध्ये देखील तिला याच वेब सीरिजबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील एक प्रश्न असा होता की, त्या वेब सीरिजमधील बोल्ड सीन्स पाहिल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती?
View this post on Instagram
यावर प्रियाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, “मुळात मी एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आली आहे. त्यामुळे एक गोष्ट साहजिक आहे की, जेव्हा अशी एखादी भूमिका करण्याची वेळ येते तेव्हा कलाकाराच्या मनावर मोठं दडपण असते. माझ्या बाबतही असेच काहीसे झाले. घरच्यांकडे स्मार्ट फोन नसल्यानं त्यांना त्या सीरिजबद्दल आणि त्यातील बोल्ड दृश्यांविषयी माहिती नव्हतं. पण तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याविषयी त्यांना मी विचारले की, माझी तुम्हाला लाज तर वाटत नाही ना? त्यावर बाबा म्हणाले की, तू आता एक अभिनेत्री आहे. तू काय करते हे प्रत्येकवेळी सांगायला हवं असंही नाही. अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली. तर आईनं ‘चूक झाली पुन्हा नाही करायची’ असं म्हटलं होतं”