बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी तिची आर्या ही वेब सीरिज बरीच लोकप्रिय झाली. ती आजपर्यंत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. आता ती तिच्या आगामी वेब सीरिजसाठी सज्ज झाली आहे.
सुश्मिताने तिच्या आगामी वेब सीरिजमधील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती आता ताली या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुश्मिता ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार असून याचे दिग्दर्शन एक मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे.
View this post on Instagram
ताली ही वेब सीरिज ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या बायोग्राफीवर आधारित आहे. सुश्मिताला या वेब सीरिजचे स्क्रिप्ट आवडल्याने तिने त्वरित या भूमिकेसाठी होकार दिला. या वेब सीरिजचे दिग्दर्शक रवी जाधव करणार असून या सीरिजवर काम सुरू झाल असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून एकूण ६ एपिसोड मध्ये दिसणार आहे.
या वेब सीरिजची पोस्टद्वारे घोषणा करत सुश्मिताने कॅप्शन लिहले की, “ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! या सुंदर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारण्याचं आणि तिची कथा जगासमोर आणण्याचे भाग्य मला मिळालं यापेक्षा अभिमानास्पद काहीच नाही. मी कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली. इथे आपलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. खूप सारं प्रेम.”