‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. हे दोघे नेहमीच एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत, नुकतेच हार्दिकने त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर केले , तर अक्षयाने तिच्या मैत्रिणींसोबतचे बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले. सध्या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरु आहे. हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.
अक्षयाने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला, त्या व्हिडीओमध्ये अक्षयाने त्या दोघांचे काही रोमँटिक फोटो आणि काही व्हिडीओ पोस्ट केले असून या व्हिडीओच्या सुरुवातीला हार्दिक चहा पिताना मजेशीर हावभाव करताना दिसतोय.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत अक्षयाने खाली लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू माझ्यासाठी जग आहेस. तू माझे कायमचे मनोरंजन आहेस. तू माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”