बॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ओळखले जातात. आलिया आणि रणबीरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी आलियाच्या गरोदरपणाची गुडन्यूज चाहत्यांना दिली.
गरोदरपणातही ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया अॅक्टिव्ह होती. आलिया शेअर करत असलेल्या फोटोज् मुळे ती सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. येत्या नोव्हेंबर अखेरीस ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र तिच्या गरोदरपणाची आणि येणाऱ्या नव्या पाहुण्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
आलियाच्या बाळासाठी कपूर कुटुंबियांप्रमाणेच तिचे चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. तर नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने देखील आलियाच्या होणाऱ्या बाळाबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफचा ‘फोन भूत’ हा आगामी चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिला आलिया बद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांवर तिने अगदीच स्पष्टपणे उत्तरे दिली आहेत.
View this post on Instagram
मुलाखतीदरम्यान कतरिनाला विचारण्यात आले की, जर तू भविष्यात कधीही आलिया भट्टला भेटलीस तर तू काय करशील? त्यावर तिने उत्तर दिले की,
“आलिया ही सध्या गरोदर आहे. त्यामुळे मला तिच्या बेबी बंपला पाहून त्याला हात लावण्याची फार इच्छा आहे. हे फारच गंमतीशीर आहे. पण मला हे करायचे आहे. मी अनेकदा तिला जीममध्ये पाहते. ती फारच मस्त आहे. अजूनही ती नियमित जीममध्ये येऊन वर्कआऊट करत असते. मला ती फार आवडते.”