बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हंसिका मोटवानी. बालकलाकार म्हणून हंसिकानं तिच्या करिअरला सुरूवात केली. तर आता लवकरच ‘राउडी बेबी’ या आगामी तामिळ सिनेमामध्ये ती दिसणार आहे. आजपर्यंत तिने कोई मिल गया, बिर्याणी, महा, रोमिओ जुलीएट यांसारख्या अनेक चित्रपटांतून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
हंसिका आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतच तिने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरून काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. हंसिकाच्या बॉयफ्रेंडने तिला एकदम रोमँटिक अंदाजामध्ये प्रपोज केलं आहे.
View this post on Instagram
सोहेल कथुरिया याने थेट पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून हंसिकाला लग्नाची मागणी घातली, आणि हंसिकाने त्याला होकारही दिला. त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांच्याच नात्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या फोटोज् वर अनुष्का शेट्टी, वरुण धवन, श्रिया रेड्डी, पीवी सिंधु यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हंसिका आणि तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया हे मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे बिझनेस पार्टनर आहेत. २०२० मध्ये दोघांनी स्वत:ची इव्हेंट प्लानिंग कंपनी सुरू केली. दोघांमध्ये प्रेम झालं आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हंसिका आणि सोहेल खास डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यासाठी त्यांनी जयपूरच्या पिंक सिटी मधील ४५० वर्षे जुना मुंडोता हा किल्ला निवडला आहे.