मराठीतील ‘गोदावरी’ हा निखील महाजन दिग्दर्शित आणि जितेंद्र जोशी यांचा निर्मिती क्षेत्रातील पहिलाच चित्रपट आहे. अश्रद्धतेकडून श्रध्तेचाप्रवास म्हणजे ‘गोदावरी’ हा चित्रपट. चित्रपट रिलीज होण्याआधीच या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. इक्फी या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर निखील महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आहे. हा चित्रपट दिग्दर्शक शशिकांत कामत यांना समर्पित केला आहे. शशिकांत कामत यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचे नाव चित्रपटाच्या मुख्य पात्राला देण्यात आले आहे. जितेंद्र जोशींच्या मुख्य पात्राभोवती फिरणारा आणि आयुष्यातील सर्वच गोष्टींना स्पर्श करणारा ‘गोदावरी’ नक्कीच पाहायला हवा.
हिंदीतला ‘उंचाई’ हा ४ मित्रांच्या आयुष्याभोवती फिरणारा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्झोंग्पा या चार मित्रांची ही गोष्ट आहे. डॅनी डेन्झोंग्पा यांची एव्हरेस्ट वर जाण्याची इच्छा त्यांच्या नंतर तिघे मित्र कसे पूर्ण करतात याचा हा साहसमयी प्रवास, त्यांना वयामुळे येणारे अडथळे, या सगळ्यात त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभलेली परिणीती चोप्रा त्यांना कसे मार्गदर्शन करते ही गोष्ट पाहण्यासारखी आहे. हे तीन मित्र वय झालेले असून म्हातारपणातील व्याधींवर मात करून एव्हरेस्ट वर पोहचतात का हे या चित्रपटात पाहायला मिळेल.
मूळ तेलगु आणि इतर अनेक भाषेत रिलीज होणारा ‘यशोदा’ हा चित्रपट एक सायन्स बेस्ड अॅक्शन थ्रिलर आहे. इवा नावाच्या सरोगसी सेंटर भोवती फिरणारा हा चित्रपट बऱ्याच गोष्टी उलगडत जातो. सरोगसी सोडून या सेंटरमध्ये इतरही काही गोष्टी होत आहेत याचा संशय यशोदा म्हणजेच समंथाला येतो आणि यशोदा म्हणजेच साक्षात कृष्णाला सांभाळलेली आई या वाक्याने चित्रपट वेग घ्यायला सुरवात करतो असे ट्रेलर मध्ये दिसून येते. समंथाच्या ऍक्शन मूव्ह्स पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
लास्ट बट नॉट द लिस्ट मार्वेल सिरीज मधला ‘वकांडा फॉरएव्हर : ब्लॅक पँथर’ हा चित्रपट! या चित्रपटाचा हिरो चॅडविक बोसमन याचे खऱ्या आयुष्यात निधन झाल्यानंतर या चित्रपटाचा हिरो कोण हे नाव अजून समोर आलेले नाही. चित्रपटात राज्यावर येणारे नवे संकट कोणते आणि त्यांच्या राज्याला वाचवण्यासाठी येणारा नवीन ब्लॅक पँथर कोण? हे पाहण्यासारखे आहे.
तर येत्या आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा बघायचा प्लॅन करत आहात?