आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यात लग्न आणि प्रेग्नन्सी हा सगळा उत्सुकतेचा विषय असतो. आज आपण अशा कलाकार कपल्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे लग्नाच्या काही महिन्यांतच आईवडील झाले.
यात पहिल्या नंबरवर आहे नुकतेच आई वडील झालेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. हे दोघे लग्नानंतर अवघ्या ७ महिन्यातच आईबाबा झाले.
यानंतर दुसरी जोडी आहे ती म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव रेखी. यांनी लग्नानंतर अवघ्या ३ महिन्यातच त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.
तिसऱ्या क्रमांकावर आहेत अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या. यांनी २०२० मध्ये आपल्या एंगेजमेंटची बातमी जाहीर केल्यानंतर घाईघाईत लग्न केले आणि जुलै २०२० मध्ये मुलगा झाल्याची बातमी दिली.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनीही लग्नाच्या एका वर्षाच्या आतच गुड न्यूज देत एका गोंडस मुलीला जन्म दिला. या जोडप्याने 10 मे 2018 रोजी लग्न केले आणि त्यांच्या मुलीचा जन्म नोव्हेंबर 2018 मध्ये झाला.
कोंकणा सेन आणि रणबीर शौरी यांनी सुद्धा लग्नापूर्वी बाळाचे नियोजन केले होते. लग्न करून काही दिवसातच ते एका मुलाचे आई-वडील झाले. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत.
नीना गुप्ता आणि मसाबाबद्दल तुम्हाला तर ठाऊकच आहे. यांसारखे लहान मोठे अनेक कलाकार आपल्या पर्सनल लाईफ बद्दल नेहमीच चर्चेत असतात.