एक प्रसिद्ध पंजाबी गायक आणि नेता सिद्धू मूसेवाला याची सहा महिन्यापूर्वी हत्या झाली.
असं म्हणतात कलाकार गेले तरी त्यांच्या कलेतून ते जिवंत राहतात आणि हे खरच आहे. आजही त्याचा चाहता वर्ग त्याची गाणी सोशल मिडिया वर शेअर करत असतात. सिद्धूचा मित्र परिवार, त्याचे देश विदेशातले लाखो चाहते सुद्धा त्याला विसरू शकले नाहीत. त्याचे वडील आजही त्याच्या फोटोला मिठी मारून बसलेले दिसून येतात.
सिद्धूच्या मित्रांनी असा निर्णय घेतला की, ज्यामुळे सिद्धूच्या चाहत्यांना सिद्धूला पुन्हा एकदा भेटता येणार आहे. सिद्धुने गेल्यावर्षी एक गाणे रेकॉर्ड केले होते आणि २ सप्टेंबर अशी त्याची तारीख निश्चित झाली होती पण काही कारणास्तव ते गाणे ८ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आले. रिलीज झाल्यानंतर जी रक्कम हाती येणार त्यातील काही हिस्सा त्याच्या आई वडिलांना दिला जाईल.
सिद्धू चा मित्र सलीम मर्चंट याने या गाण्याविषयी माहिती दिली आहे की ‘जानदी वार’ असे या गाण्याचे लिरिक्स असून गेल्या वर्षी अफसाना खानसोबत सिद्धूने हे गाणे गायले होते आणि या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धूची झलकही पाहायला मिळत आहे. सिद्धूने गायलेले हे शेवटचे गाणे असल्यामुळे हे गाणे अनमोल आहे. कोणतंही गाणं अगदी मनापासून गाण्यात सिद्धू पटाइत होता.
हे गाणं खूप संवेदनशील, भावनिक आणि मनाला स्पर्शून जाणारं आहे ज्यामुळे आपण सिद्धूला प्रत्यक्ष गाणं म्हणताना पाहत आहोत की काय असं प्रत्येकाला वाटत असेल असंही सलीम म्हणाला. यानिमित्ताने सिद्धूच्या चाहत्यांनी त्याला सलामी दिली आहे. या गाण्याला एकाच दिवसात १३ मिलियन व्हीव्स गेले आहेत. यावरूनच जानदी वार हे गाण चाहत्यांना किती आवडलय याचा अंदाज येतो.