बिग बॉस या रियालिटी शो ची क्रेझ सगळीकडेच आहे.
बिग बॉस हिंदीचा हा १६ वा सिझन आहे. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी घेतल्या जातात आणि बिग बॉसच्या घराच्या नियमाप्रमाणे सर्वांना वागावे लागते.
जर तसे झाले नाही तर त्यांना शिक्षा देण्यात येते नाहीतर थेट घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. असचं काहीसं झालं बिग बॉस १६ च्या सिझन मध्ये. अर्चना आणि शिव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर भांडणात झाले. त्यात अर्चनाने शिवला कानाखाली मारण्यासाठी हाथ उचलला आणि नंतर तिने त्याचा थेट गळाच पकडला या शारीरिक हिंसेमुळे तिला बिग बॉस ने घराबाहेर काढले, तर बघुयात कोण आहे ही अर्चना गौतम…!
विविध कॉम्पिटिशन मधून भारताला रिप्रेझेंट करणारी अर्चना गौतम ही एक मॉडेल आहे. तिने मिस बिकनी २०१८ हा टायटल जिंकला त्यासोबतच मिस उत्तरप्रदेश २०१४, मिस कॉस्मो इंडिया २०१८, मिस टॅलेंट वर्ल्ड २०१८ किताब तिने जिंकले आहेत.
तसेच ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर सारख्या फिल्म्स मध्ये कॅमिओ केला आहे. अर्चना एक पाॅलीटीशियन सुद्धा आहे. २०२१ मध्ये तिने नॅशनल कॉग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. २०२२ मध्ये ती निवडणूक सुद्धा लढली मात्र तिला त्यात फारसे यश मिळाले नाही.
तुम्हाला काय वाटतं अर्चनाची परत एकदा बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होईल?