आतापर्यंत चित्रपटसृष्टीला ठाकरे, सिक्रेट गेम, गैंग्स ऑफ वासेपुर, बजरंगी भाईजान, किक२, रईस, हिरोपंती २ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपट देणारा आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी. तो आता एका नवीन भूमिकेत दिसून येणार आहे. आता त्याचा ‘हड्डी’ हा नवीन चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येत आहे, मागील काही दिवसांपासून नवाजुद्दीन या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लॉंच झाले, या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन एका वेगळ्या भूमिकेत दिसून येत आहेत. त्याच्या या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिरव्या रंगाची काठापदराची साडी, ओठावर गडद रंगाची लिपस्टिक, हातात लाल हिरव्या बांगड्या, डोळ्यात काजळ आणि लांबलचक केस या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवाजुद्दीनचा हा लूक सिनेमाची उत्सुकता वाढवत आहे.
हड्डी हा सिनेमा ट्रान्सजेंडर यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे, नवाजुद्दिनने या सिनेमात ८० खऱ्या ट्रान्सजेंडर सोबत काम केले आहे. “ट्रान्सजेंडरसोबत काम करायला मिळणं हा माझा सन्मान आणि भाग्य आहे” अस नवाजुद्दिन म्हणाला.
View this post on Instagram
पुढे नवाजुद्दिन अस ही म्हणाला, “हड्डी सिनेमात खऱ्या ट्रान्सजेंडरसोबत काम करणं हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. खरेतर ही सन्मानाची गोष्ट आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मला ट्रान्सजेंडर समुदाय समजता आला. तसेच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”
नवाजुद्दिन नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करताना दिसून येतो, त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला देखील पडतात. यावेळी देखील नवाजुद्दिन एका नवीन भूमिकेत दिसून येणार आहे, त्यांला या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहेत. सिनेमाचे पोस्टर देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.
हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, झी स्टूडीओ आणि आनंदिता स्टूडियोजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.