बिग बॉसच्या घरात सतत काहीना काही सुरु असतच, टेलिव्हिजन विश्वातील सर्वात वादग्रस्त शो अशी याची ओळख आहे. बिग बॉसच्या घरातल वातावरण सध्या खूप तापल आहे. टीना दत्ताच्या पायाला दुखापत झाल्यानंतर शालीन तिला आराम मिळावा म्हणून प्रयत्न करत होता, पण टीनाला त्याचा त्रास होत होता. हे एम.सी. स्टॅनच्या लक्षात आले आणि तो शालीनला म्हणाला की, हे करू नको.. पण यावेळी शालीन एमसीला अस काही काही बोलला की, ज्याचा एमसीला प्रचंड राग आला आणि त्याने शालीनला शिवी दिली.
शालीन आणि एमसी मधला हा वाद इतका वाढला की ते दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले, इतकेच नाही तर या दरम्यान शालीनने एमसीला काही काळ पकडून देखील ठेवले. एमसीला वाचवण्यासाठी शिव आणि साजिद मध्ये आले.
View this post on Instagram
या वादानंतर एमसी आणि शालीन वेगवेगळ्या रूममध्ये जातात. मात्र, यावेळी प्रियांका शालीन कडे जाते आणि त्याला एमसी स्टॅनविरोधात भडकून देते. तिच्या सोबतच सुम्बुल देखील शालीन ला भडकवते आणि स्वतः रडत बसते. हा सगळा प्रकार टीनाला अजिबात आवडत नाही. प्रियांका आणि सुम्बुल या दोघीही शालीनला भडकवून देत असल्याचं टीनाच्या लक्षात येताच ती शालीनच्या रूम मध्ये त्याला समजवण्यासाठी जाते. पण नेहमीप्रमाणे सुम्बुल टीनाला काहीच बोलू देत नाही. यामुळे टीनाला राग येतो आणि ती सुम्बुलशी भांडते.
विकेंड वारमध्ये सलमानने यावरून सुम्बुलची चांगलीच शाळा घेतली, सलमान सुम्बुलला “तू नाटक करत आहेस अस ही म्हणाला. कारण या भांडणामध्ये सुम्बुलचे काही ही नसताना ती शालीनला फक्त भडकवत होती. टीना म्हणते की,” सुम्बुल फक्त शालीनच्या मागे मागे करत असते. तो टाॅयलेटमध्ये गेला तरी ती बाहेर बाहेर थांबते.”
आता या दोघींमधील हा वाद किती वाढतो हे पाहाला मज्जा येणार आहे.