सध्या गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शंकर महादेवन यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत, त्यातील बरीच गाणी हिट देखील झाली आहेत. आता ते एका नवीन गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत, ते म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातील ‘बहार आला’ या गाण्यामुळे.
‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात अतिशय सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य प्रवास आहे. ही गोष्ट आहे एका स्वप्नाची… ही गोष्ट आहे एका पैठणीची… एक पैठणी असावी, इतके साधे स्वप्न बाळगणारी इंद्रायणी, तिच्या स्वप्नांबाबत खूप सकारात्मक दिसत आहे.
View this post on Instagram
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळवलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटातील ‘बहार आला’ या गाण्याला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. सायली संजीव आणि सुव्रत जोशी यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.
‘बहार आला’ या गाण्याबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले: “साध्या, हलत्या कथेत विलक्षणपणे बसणारी ही सुंदर रचना होती. हे एक अर्थपूर्ण गाणे आहे, ज्यामध्ये कालातीततेची भावना आहे. मला आनंद आहे की मी हा अशा खास चित्रपटाचा भाग आहे.”
“‘बहार आला’मध्ये आठवणींचा, प्रेमाचा शांत, निर्मळ उत्सव साजरा करण्याची गुणवत्ता आहे. भावनिक आणि अप्रतिम दर्जाच्या गाण्यांमुळे मला मराठी गाणी आवडतात. ते त्यांचे निर्दोषत्व टिकवून ठेवण्यास सक्षम आहेत.”
हे गाणे माणिक गणेश यांनी लिहिले असून संगीतबद्ध देखील केले आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ 2 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.