अरजित सिंग म्हणजेच बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आणि संगीतकार. भारतातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. तसेच संपूर्ण भारतात त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे.
मागील वर्षीच म्हणजेच २०२१ मध्ये स्पाॅटिफाय द्वारे त्यांना सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय कलाकार म्हणून घोषित करण्यात आले. यावरून समजून येते की देशभरात असंख्य चाहते आहेत.
View this post on Instagram
अरजितला लाईव्ह पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रेक्षक भरपूर उत्सुक असतातच. आताच आलेल्या मिडिया रिपोर्टनुसार अरिजित लवकरच भारतभर दौरा करणार आहे. देशभरातल्या विविध महत्त्वाच्या शहरामध्ये कॉन्सर्ट होणार आहे. चाहते यासाठी उत्सुक असले तरी कॉन्सर्ट संबंधित व्हायरल होणारा स्क्रीनशॉट पाहून प्रेक्षक मात्र थक्क झालेत.
हा व्हायरल होणारा स्क्रीनशॉट अरजितच्या कॉन्सर्टच्या बुकिंगचा आहे. यात तिकिटांची दिलेली किंमत पाहून प्रेक्षकवर्गाला धक्का बसला आहे. कारण त्यात अरजितच्या कॉन्सर्टची किंमत १६ लाख रुपये आहे.
या स्क्रिनशॉटमध्ये विविध प्रकारच्या तिकिटांचे दर आहेत. ज्याची सुरुवात ९९९ रुपयांपासून होत असून सर्वात महागडे तिकिट १६ लाखांचे आहे. सर्वात महागडे तिकिट प्रीमियम लाउंज या कॅटेगरीतील आहे, त्यामुळे त्याचे दर एवढे जास्त असल्याचे बोलले जात आहे. प्रीमियम लाउंजचे तिकीट असले तरीही एवढे पैसे देऊन कॉन्सर्ट पाहायला जाणाऱ्यांची संख्या नक्कीच बोटावर मोजण्या एवढी असेल. याशिवाय १२ आणि १४ लाखाचे तिकिटही आहे.
एका युजरने हा स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले आहे की ‘मला अरिजीतची गाणी आवडतात पण एवढे पैसे खर्च करणार नाही’. त्यावर एका युजरने अशी कमेंट केली आहे की, ‘१६ लाखात त्याने स्वत: घरी येऊन आम्हाला गाणं ऐकवलं पाहिजे.’
अरजितची सॅड साँग साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे एकाने अशी कमेंट केली आहे, ‘रडण्यासाठी १६ लाख कुणी खर्च करू नये.’ आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की, ‘१६ लाखात अरजितच्या शेजारी घर घेऊ, रोज त्याला ऐकता येईल’. व्हायरल होणाऱ्या या स्क्रिनशॉटवर अशाप्रकारे मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार अरजितचा २७ जानेवारी २०२३ ला पुण्यात कॉन्सर्ट होणार आहे.