साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी समांथा प्रभू. समांथा ही नेहमीच तिच्या अनोख्या स्टाईलमुळे बरीच चर्चेत असते. तर तिने साऊथ सोबतच बॉलिवूड इंडस्ट्री मध्येही चांगलेच नाव कमावले आहे.
समांथाने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर देशभरात प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तसेच तिने थेरी, मेसर्ल, अंजान, अ आ, वृंदावनम यांसारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
समांथाला नुकताच लोकप्रिय महिला स्टार हा बहुमान मिळाला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्रींना मागे टाकून तिने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.
Ormax Stars India Love ने प्रसिद्ध केलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या सर्वाधिक लोकप्रिय फिमेल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. तर या यादीत समांथाने रश्मिका, दीपिका, आलिया, कतरिना यांना मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. तर तिच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आलिया भट्ट, तिसऱ्या क्रमांकावर नयनतारा, चौथ्या क्रमांकावर काजल अग्रवाल, पाचव्या क्रमांकावर दीपिका पदुकोण, सहाव्या क्रमांकावर रश्मिका मंदान्ना, सातव्या क्रमांकावर कतरिना कैफ, आठव्या क्रमांकावर अनुष्का शेट्टी, नवव्या क्रमांकावर क्रिती सुरेश आणि दहाव्या क्रमांकावर तृषा कृष्णन आहे.
यावरून असे लक्षात येते की प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यामध्ये सध्या बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडस्ट्री मधील अभिनेत्री यशस्वी ठरल्या आहेत.