सध्या सर्वत्रच बिग बॉसची चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठी या रिॲलिटी शोचा हा चौथा सिझन चालू आहे. ‘ऑल इज वेल’ या थीमवर चालू झालेला सीझन दिवसेंदिवस अधिकच रंजक वळण घेत आहे.
बिग बॉसच्या घरात दररोज नवनवीन टास्कसह स्पर्धकांमधील वाद, रुसवे – फुगवे आणि मैत्री पाहायला मिळत आहे.
तर सध्या चर्चा आहे ती फक्त तेजस्विनी लोणारीची, आजपर्यंत तिने तिच्या उत्तम खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विनाकारण आरडा – ओरडा, वाद यांपासून लांब राहत टास्क मध्ये उत्तम कामगिरी करून ती सीझन चारची टास्क क्विन ठरत आहे. नेहमी हसतमुख दिसणारी तेजस्विनीचं कौतुक फक्त चाहतेच नाही तर बिग बॉसच्या मागील सीझन मधील स्पर्धकांनी देखील केले आहे.
परंतू आता मात्र तिच्या चाहत्यांसह घरातील इतर सदस्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याचे कारण म्हणजे तेजस्विनीला टास्क दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे नाईलाजाने का होईना थेट घरचा मार्ग अवलंबवा लागला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिला बिग बॉस च्या घराचा निरोप घ्यावा लागला.
त्यामुळे आता ती पुन्हा घरात येणार की नाही ही शंकाच आहे. आणि असे अनपेक्षितरित्या झालेल्या स्पर्धकाच्या एक्झिट मुळे या आठवड्यात आणखी एक एलिमिनेशन होणार का याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.