आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात नेहमी काहीना काही घडत असत, त्यांच्या बाबतीत नेहमी बऱ्याच अफवा देखी ऐकायला मिळतात. यातील काही अफवा कधी कधी खऱ्या देखील असतात. अनेक वेळा कलाकार यावर बोलणं टाळतात, पण अनेकवेळा अशा काही बातम्या येतात की त्यांना बोलणं भाग पडतं.
असच काहीस आता अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. अभिनेत्री मलायका प्रेग्नंट असल्याची सगळीकडेच सध्या चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
यातच मलायकाने यावर भाष्य केल आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही बातमी घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. मलायकाने खोट्या बातम्या पसरवल्यामुळे न्यूज साईट आणि रिपोर्टरला चांगलेच सुनावले आहे. तिने बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत राग व्यक्त केला.
मलायकाने लिहिले आहे की, “हे सर्वात खालच्या थराचं काम आहे जे तुम्ही करू शकता. असंवेदनशील राहून तुम्ही हे सहज लिहिलंय, ते अनैतिक आहे, कचरा आहे. असे खोटे गॉसिप लेख माध्यमांमध्ये पसरतात आणि मग खरे ठरतात. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका.”
एका वेब पोर्टलने बातमी प्रसिद्ध केली होती की अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या घरी गुड न्यूज आहे. तसेच हे कपल ऑक्टोबरमध्ये लंडनला गेले होते, जिथे मलायकाने तिच्या जवळच्या लोकांसोबत प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली. या बातमीनंतर अर्जुन कपूरने लिहिले होते की, ‘तुम्ही आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका.’ आता मलायकानेही या वृत्तावर आपले म्हणणे मांडले आहे.
मलायका आणि अर्जुन २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत. यापूर्वी मलायकाचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते आणि दोघांना एक मुलगा सुद्धा आहे.