बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा चाहता वर्ग देखील मोठं आहे. फक्त महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण जग्भरतून या शो चे मोठ्या प्रमाणत चाहते आहेत. या शो च्या प्रत्येक एपिसोडची चाहते अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात.
सध्या बिग बॉस हिंदीच १६ व पर्व सुरु आहे. हा सीजन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. गेले अनेक सीजन या शोच्या सूत्र संचालनाची जबाबदारी सलमान खान याच्या कडे आहे. काही चाहते तर फक्त सलमान खान साठी बिग बॉस पाहत असतात. पण आता एक नवीनच चर्चा समोर आली आहे, ती म्हणजे सलमान खान सीजनच्या मध्यावर हा शो सोडणार असल्याची. सलमान खान बिग बॉस सोडणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. सलमान खानचा बिग बॉससोबतचा करार संपत आला आहे. ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात वीकेंडच्या वारला सलमानला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात, पण आता सलमानची जागा कोण घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
‘बिग बॉस 16’ हा सलमान खानचा वादग्रस्त कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी या कार्यक्रमाचा सलमानसोबत असलेला करार संपत आहे. त्यामुळे आता सलमान खान हा कार्यक्रम सोडणार असल्याने त्याची जागा करण जौहर घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘बिग बॉस 16’च्या आगामी भागात करण जौहर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसू शकतो. ‘बिग बॉस 16’ संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच निर्माते सध्या करण जौहरशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आता सलमानचा करार वाढवणार की करण जौहर सूत्रसंचालन करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.