सध्या सोशल मिडीयावर, थिएटरमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट म्हणजे ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला अन पाहता पाहता या चित्रपटाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.
या चित्रपटाबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे जेनेलिया हिने या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे, त्याचबरोबर आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने देखील दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना जरा जास्तच अपेक्षा होत्या आणि त्या आता पूर्ण झाल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता आठवडा उलटला तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमावले तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २३ लाख आणि रविवारी थेट ४ कोटी ५० लाख कमाई करत या चित्रपटाने नवव्या दिवशी ५ कोटींचा टप्पा पार करत आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल २७.७२ कोटींची कमाई केली आहे.
अशाप्रकारे हिंदी चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट चांगलाच गाजत आहे त्यामुळे हा ब्लॉकबस्टर चित्रपट आणखी किती कमाई करणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.