बिग बॉस १६ सध्या देशातील सर्वात लोकप्रिय असलेला रिएॅलिटी शो आहे. सगळेच स्पर्धक उत्तम खेळत आहेत. बिग बॉसच्या घरात येऊन स्पर्धकांना अवघे तीन महिने उलटून गेलेत, सगळ्याच स्पर्धकांना आपल्या घरच्यांची खूप आठवण येत आहे. हा आठवडा स्पर्धकांसाठी खूप स्पेशल ठरणारा आहे. या आठवड्यात स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरचे येणार आहेत.
फॅमिली वीक सुरु होताच बिग बॉस च्या घरातील सदस्यांना त्यांच्या फॅमिली मेंबरला भेटता येणार आहे. यांपैकी बिग बॉसच्या घरातील एक मेंबर साजिद खानला भेटण्यासाठी त्याची बहिण फराह खान हिची एंट्री होताच ती साजिद ला पाहून भाऊक झाली. तिने त्याला पाहताच क्षणी मिठी मारली व तिच्या डोळ्यातून अश्रू आले. “आईला तुझ्यावर गर्व आहे. तू खूप भाग्यवान आहेस. तुला घरात चांगली मंडळी मिळाली आहे” असं फराह साजिदला म्हणाली.
बिग बॉसच्या घरात साजिद, स्टॅन, शिव ठाकरे व अब्दू रोझिक यांची घट्ट मैत्री झाली आहे. पुढे फराह खानने साजिद सोबत स्टॅन, शिव व अब्दूची देखील भेट घेतली आहे. त्यांच्या भेटी मध्ये तिने अस सांगितलं की “माझा एक भाऊ घरात होता. पण जाताना मी आणखी तीन भाऊ घेऊन जात आहे”.
‘बिग बॉस १६’च्या घरात सहभागी झालेला मराठमोळा स्पर्धक शिव ठाकरे याला प्रेक्षकांची पसंती मिळत एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेळा घरातील कॅप्टनपद पटकावत शिव ठाकरेने विक्रम रचला आहे, तसेच तो बिग बॉस मराठीच्या घरात देखील दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. तर शिवला भेटायला त्याची आई घरात येणार आहे.
घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येणार असल्यामुळे हा आठवडा खास असणार आहे.