विनायक माळी यांचा जन्म पनवेल मध्ये एका आगरी कुटुंबात झालेला असून त्याची आई गृहिणी व वडील सरकारी कर्मचारी आहेत. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्याला ठाण्याला राहायला लागत, त्याचे शिक्षण ठाण्यातच पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला विप्रो कंपनीत नोकरी लागली. काही कारणांमुळे विनायकनेही चांगल्या पगाराची नोकरी सोडली व त्याने पुढे जाऊन एलएलबीची डिग्री घेण्याचा निर्णय घेतला. एलएलबी करत असताना पहिल्या वर्षापासून युट्यूबवर व्हिडीओ टाकणे स्क्रिप्ट लिहिणे अशी काम तो करू लागला. तो त्याच्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये व्हिडीओ बनवू लागला.
त्याने सर्वातआधी हिंदी भाषेत व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. पण त्याला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आपल्या मूळ भाषेत म्हणजेच आगरी भाषेत व्हिडीओ बनवायला सुरवात केली असता त्याच्या व्हिडीओला खूप कमी वेळात चांगला प्रतिसाद मिळू लागला. हळूहळू विनायक माळी फेमस होऊ लागला व त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होऊ लागले. आता तो लवकरच सन मराठी वाहिनीवरील ‘माझी माणसं‘ या मालिकेमधुन प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्याचा हा पहिलाच टीव्ही शो आहे.
आपल्या विशिष्ट शैलीने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवणाऱ्या विनायक माळीला मालिकेत पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.