‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका कक्कर. दीपिका सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस सिझन १२ ची ती विजेती देखील ठरली होती. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
२०११ मध्ये तिने पायलट रौनक सॅमसनशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही, म्हणून २०१५ मध्ये ते दोघे वेगळे झाले. तर तिची ससुराल सिमर का ही मालिका ही सुरु असताना सहकलाकार शोएब इब्राहिम सोबत आधी मैत्री आणि नंतर प्रेम वाढत गेलं आणि २२ फेब्रुवारी २०१८ रोजी शोएबच्या मूळ गावी त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्या दोघांच लग्न झालं.
View this post on Instagram
आता त्यांच्या लग्नाला ५ वर्षे उलटून गेली आहेत. दीपिका आणि शोएब नेहमीच त्या दोघांचे रोमांटिक फोटोज सोशल मिडीयावर शेअर करत असतात. तर आज त्यांनी त्यांचा आणखी एक खास फोटो शेअर करत त्यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
त्यांनी दोघांचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे, ज्यात त्या दोघांनी टोपी घातली आहे आणि त्यावर लिहिले आहे की, ‘मॉम टू बी’ आणि ‘डॅड टू बी’ तसेच कमेंट मध्ये लिहिले की, “कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थता या भावनांनी बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहोत आमच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर टप्पा आहे. लवकरच आम्ही पालक होणार आहोत. तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची आम्हाला गरज आहे.”
दीपिकाचे मागील काही फोटोज पाहून तिच्या प्रेगनन्सीची चर्चा रंगली होती, पण तेव्हा मात्र दीपिका आणि शोएब दोघांनी मौन बाळगले होते. पण आज त्यांनी ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.