भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांचा आज विवाह सोहळा पार पडणार आहे. क्रिकेट आणि बॉलीवूड हे समीकरण आपल्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही. या आधी देखील अनेक क्रिकेटर आणि बॉलीवूड अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली आहे. सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती अथिया आणि राहुल यांच्या लग्नाची. खंडाळ्यातील फॉर्म हाऊसमध्ये दोघांचे लग्न होणार आहे.
अथिया आणि राहुल यांच्या लव्हस्टोरीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती, गेल्या ३ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकवेळा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनीही आपलं नातं गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांची जवळीक कोणापासूनही लपून राहू शकली नाही. 2019 मध्ये अथिया आणि राहुलची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडने केली होती. पहिल्या भेटीत दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडली, त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
जेव्हा अथिया आणि राहुलने इंस्टाग्रामवर एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आणखीनच वाढली. पुन्हा एकदा या दोघांचे नाते तेव्हा चर्चेत आले, जेव्हा 2021 मध्ये राहुल कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. तेव्हा अथियाही त्याच्यासोबत तिथे पोहोचली. दोघांनी याबाबत काहीही सांगितले नाही, मात्र त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.
के. एल. राहुलने 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवसानिमित्त अथियासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. अथियासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना राहुलने खूप रोमँटिक कॅप्शन लिहिले होते. यानंतर राहुल अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या ‘तडप’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही पोहोचला होता. जिथे राहुल आणि अथियाने कपल पोजही दिली. दोघांनी पहिल्यांदाच एका इव्हेंटमध्ये एकत्र भाग घेतला होता.