सर्व मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ या लोकप्रिय शो मधील लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री वनिता खरात हिने अभिनयाने आणि तिच्या कामाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.
वनिता लवकरच सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्रच तिच्याचं नावाची चर्चा सुरु आहे. ते दोघे कायम त्यांचे एकत्रित फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असत. त्यामुळे सर्वांनाच कळून चुकले होते की ते दोघे लवकरच लग्न करणार आहे.
काही दिवसांपूर्वी त्या दोघांचे प्री-वेडिंग फोटोशूट पार पडले आणि त्यांच्या हटके अंदाजामुळे ते प्रचंड चर्चेत आले. त्यांनतर आता त्यांच्या लग्नविधीतील विविध कार्यक्रर्मांचे फोटो देखील चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकतेच त्यांच्या मेहंदीचे फोटोज समोर आले. आता मात्र त्यांच्या लग्नाला काहीच तास उरले असताना, अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
View this post on Instagram
वनिताच्या लग्नानिमित्त तिची मैत्रीण आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ताने तिला खूपच खास गिफ्ट दिले आहे. आपणा सर्वांना माहित आहे की, काही दिवसांपूर्वीच तिने तिचा नवीन ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. प्राजक्ताचा ‘प्राजक्तराज’ हा ब्रँड अस्सल मराठमोळ्या दागिन्यांनी, पारंपरिक आणि घरंदाज अलंकारांनी सामावलेला आहे. आज वानिताला एवढं खास गिफ्ट मिळाले म्हणून ती भलतीच खुश आहे.
प्राजक्ताने वनिताला तिच्या ब्रँडचे काही दागिने गिफ्ट म्हणून दिले आहे. तिने वनिताला सोनसळीचा सेट गिफ्ट केला आहे. तर हे दागिने पाहून वनिता प्रचंड खुश झालेली पाहायला मिळत आहे. तसेच वनिताने लग्नात प्राजक्ताने दिलेले दागिने परिधान करावे ही इच्छा प्राजक्ताने व्यक्त केली आहे. व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिले की’ “वनिता, तुझ्यावर सोनसळा कलेक्शन अत्यंत शोभून दिसेल याची खात्री आहे मला.. आणि तुझ्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.”