टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या विषयाला वाहिलेल्या मालिका आणण्याची नुसती चढाओढ लागली आहे.
मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. मराठी मालिकाही घराघरात आवडीने पाहिल्या जातात. त्यात झी मराठी वरील मालिका म्हंटल की सगळ्यांच्या आवडीच्या मालिका. झी मराठी वरील प्रत्येक मालिका या प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. या मालिकांच्या हटके विषयामुळे अनेक प्रेक्षक त्याला पसंती देताना पाहायला मिळतात. पण आता झी मराठी वरील दोन जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या वाहिनीने याबद्दलची घोषणा केली.
टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या विषयाला वाहिलेल्या मालिका आणण्याची नुसती चढाओढ लागली आहे. पण जुन्या मालिकांची बातच काही और. मागील काही दिवसापासून टीआरपी खूप कमी झाला आहे, त्यामुळे झी मराठीने जुन्या मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच दोन गाजलेल्या मालिका पुन्हा सगळ्यांच्या भेटीला येत आहेत.
View this post on Instagram
मनोरंजन मराठी या इन्स्टाग्राम पेजने याबद्दलची माहिती दिली आहे. पुन्हा एकदा अनुभवा श्री-जान्हवी आणि जय-आदिती यांच्या प्रेमकथेचा अनुभव घेऊया” असे कॅप्शन त्यांनी याला दिले आहे. ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत. येत्या १३ फेब्रुवारी २०२३ पासून ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार आहे. संध्याकाळी ४ आणि ५ वाजता या वेळात या दोन मालिका प्रसारित होणार आहे.
दरम्यान प्रेक्षकांच्या आग्रहाखातर या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत, असे बोललं जात आहे. तर दुसरीकडे झी मराठी वाहिनीचा घसरलेला टीआरपी सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.